प्रतिनिधी....मनोज जाधव
रुईभर :- दि 11 ऑगस्ट रोजी - जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या |लय, रुईभर येथील विविध खेळांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यालयातील पाच खेळाडूंची निवड झाली आहे. धाराशिव येथे जिल्हास्तरीय ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा सन 2025-26 वर्षासाठी 10 ऑगस्ट वार रविवार रोजी तुळजाभवानी स्टेडियम येथे संपन्न झाल्या होत्या. विद्यालयातील 16 वर्ष वयोगटातील व 18 वर्षे वयोगटातील मुले व मुली यामध्ये सहभागी झाले होते.
या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये तनुजा बालाजी ढवळे 60 मीटर रनिंग मध्ये द्वितीय, ऐश्वर्या सुग्रीव गायकवाड गोळा फेक मध्ये प्रथम क्रमांक व लांब उडी मध्ये ही प्रथम क्रमांक, आरती कमलाकर ढवळे लांब उडी मध्ये द्वितीय क्रमांक, शिवजीत श्याम तीर्थकर याने 1000 मीटर रनिंग मध्ये प्रथम क्रमांक, कल्याणी किरण गव्हाणे हिने 60 मीटर रनिंग तृतीय क्रमांक, अमृता अमरदीप कांबळे हिने लांब उडीमध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे होते. मान्यवरांच्या हस्ते सर्व खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
श्री पृथ्वीराज राजनारायण कोळगे यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांचे हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या यशस्वी खेळाडूंना प्राध्यापक प्रशांत कोळगे, श्री अश्विन कुमार पवार या क्रीडा शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की कष्टातूनच यश प्राप्त करता येते. ग्रामीण भागातून यश प्राप्त करणे सोपे नाही. सर्व अडचणीवर मात करून यश मिळाल्यानंतर त्याचा आनंद वेगळाच असतो. आपल्यातील ताकद ओळखा चांगला मार्ग निवडूनच यश संपादन करायचे असते. जीवनात खेळाला ही महत्त्व दिले पाहिजे खेळामधील प्रावीण दाखवले पाहिजे. आपल्यातील कौशल्य पणाला लावणे आवश्यक आहे. यशाच्या पायऱ्या चढत्या क्रमाने असतात पहिल्या पायरीवर यश मिळाले तर पुढच्या पायरीवर त्यापेक्षाही मोठे यश मिळत असते म्हणून सतत प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की कुठल्याही स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर नियोजन आवश्यक असते. नियोजन केले तर आपले जीवन सन्मानाने भरले जाते म्हणून वेळोवेळी दिलेला अभ्यास पूर्ण करणे त्यामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. स्पर्धेत राज्यस्तरीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत खेळाला प्रत्येकाने महत्त्व द्यावे व विद्यालयाचे संस्थेचे नावलौकिक करावे अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.
याप्रसंगी माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा गणेश शेटे तर आभार प्रशांत कोळगे यांनी केले.
0 टिप्पण्या