Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

तालुकास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत मेडशिंग्याची प्राची रोहिले ठरली अव्वल तर जिल्हास्तरीय फेरीसाठी निवड

 

    


     प्रतिनिधी... मनोज जाधव 


तालुकास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत मेडशिंग्याची प्राची रोहिले ठरली अव्वल तर जिल्हास्तरीय फेरीसाठी निवड

मेडसिंगा (ता. धाराशिव) – दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या तालुकास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मेडसिंगा येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. प्राची नितीन रोहिले हिने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरीय फेरीसाठी आपली निवड निश्चित केली.


सदर स्पर्धेत प्राचीने प्रभावी शब्दस्मरण आणि अचूक स्पेलिंग सादरीकरणाच्या जोरावर क्रमांक पटकावला. तिचा मान्यवर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मैनाक घोष यांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक विषय शिक्षक श्री. बळवंत घोगरे यांचाही विशेष सत्कार झाला.



या यशाबद्दल प्राचीचे पालक, मुख्याध्यापक श्री. पवार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. कृष्णा लाकाळ तसेच सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले.


जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धा उद्या, 13 ऑगस्ट रोजी होणार आहे. विजेत्या स्पर्धकांचा सत्कार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धा आता रंगात आली असून, जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा मान कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या