Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

श्री. स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात विद्यापीठ वर्धापन दिन साजरा

    

  

      प्रतिनिधी...मनोज जाधव 


          रुईभर :- दि 23 ऑगस्ट 2025 रोजी श्री. स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रुईभर ता. जि. धाराशिव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 67 वा वर्धापन दिन  उत्साहात साजरा करण्यात आला.    

         याप्रसंगी डॉ. आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष दादा कोळगे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व विद्यापीठ ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यापीठ गीताचे गायन करण्यात आले. 

            कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. रामदास आण्णा कोळगे मार्गदर्शन करताना म्हणाले की,  विद्यापीठाच्या उच्च शिक्षण व संशोधन  कार्याचा समाजासाठी उपयोग होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठामुळे समाजातील सर्वसामान्य मुला-मुलींना शिक्षणाची सोय झाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची व संशोधन कार्याची संधी उपलब्ध झाली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयातुन होत आहे. 



       प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की या विद्यापीठाची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून झाली आहे. सर्वांना शिक्षण मिळावे म्हणून विद्यापीठ सुरू केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यापीठासाठी दिलेले योगदान  महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आई, वडिल, कुटुंबाचे नाव उज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

       प्राचार्य संतोष कपाळे यांनी वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यापीठाचे संलग्नित श्री. समर्थ कला व विज्ञान महाविद्यालय  संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष दादा कोळगे यांनी अथक प्रयत्नातून रुईभर या ग्रामीण भागात सुरू केले. याच महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेले मुले व मुली वेगवेगळ्या पदावरती  विराजमान आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च पदवी घेऊन स्वयंपूर्ण झालेले आहेत. असेच विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन सामाजिक कार्यात सहभाग घ्यावा व देश सेवेसाठी नवीन ताकद म्हणून उभे राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

     याप्रसंगी माजी ग्राप सदस्य राजनारायण कोळगे, प्रशासकीय अधिकारी श्रीमती शिवकन्या साळुंके , इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रशांत कोळगे व आभार प्राध्यापक गणेश शेटे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या