Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

मेडशिंगा येथे “बँक आपल्या दारी” या अभिनव उपक्रमातून शेतकऱ्यांना दिलासा


       प्रतिनिधी....मनोज जाधव 
 

 मेडशिंगा येथे “बँक आपल्या दारी” या अभिनव उपक्रमातून शेतकऱ्यांना दिलासा 🌾

धाराशिव :
धाराशिव तालुक्यातील मौजे मेडशिंगा येथे बँक ऑफ महाराष्ट्र, आनंदनगर शाखेच्यावतीने “बँक आपल्या दारी” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात थेट गावात जाऊन शेतकऱ्यांना शंभर टक्के पीककर्ज मिळवून देण्यासाठी जनजागृती करण्यात आली तसेच जाग्यावरच पीककर्ज वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला.



यावेळी शासनाच्या पीएमईजीपी व सीएमईजीपी या योजनांची माहिती देत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले. कोणताही शेतकरी कर्जवंचित राहणार नाही, याचीही खात्री या उपक्रमातून देण्यात आली.



या वेळी शाखाधिकारी श्री. कुशवाह, उपशाखाधिकारी श्री. सुनील, कर्ज वसुली अधिकारी श्री. घोडके यांच्यासह गावचे सरपंच अनुरथ दूधभाते, दत्ता काका रणदिवे, काका शेलार, रमण आगळे, संदिपान भोजगुडे,मधुकर जाधव,हरून कळसाइन, किशोर साळुंखे,महेश लांडगे, सिद्धेश्वर शेलार, भारत शिंदे ,शहाजी आगळे , उद्धव घाडगे, शिवाजी कांबळे,रमेश मानेआदी मान्यवर उपस्थित होते. शेकडो शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

बँकेच्या या उपक्रमामुळे गावातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून, “बँक आपल्या दारी” ही योजना शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 🌱



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या