प्रतिनिधी....मनोज जाधव
रुईभर- दि. 25 ऑगस्ट रोजी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे सॉफ्ट टेनिस स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल खेळाडूंचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
दि. 23 ऑगस्ट 2025 रोजी (शनिवार ) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव - जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा तालुका क्रीडा संकुलन तुळजापूर येथे पार पडल्या होत्या. या स्पर्धेत जयप्रकाश उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवून विभागीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यात आडे सुयश संजय ( इ 11 विज्ञान ) 17 वर्ष वयोगटात प्रथम व कुमारी केवटे गायत्री गुरुलिंग ( इ 12 विज्ञान) मध्ये 19 वर्ष वयोगटात द्वितीय आली आहे. दोन्हीही खेळाडूंचे श्री केदार दुधंबे ( रुईभरचे केंद्रप्रमुख ) व प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
केंद्रप्रमुख केदार दुधंबे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की आपल्या विद्यालयाचा परिपाठ छान झाला. विद्यार्थ्याबरोबर प्रत्येकानी विशेष अंतर ठेवणे, तक्रार पेठी बाबत माहिती, मध्यान्ह भोजना विषयी माहिती या प्रसंगी त्यांनी सांगितली.
विद्यालयात प्रत्येक क्षेत्रात होणारी प्रगती अतुलनीय आहे . अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शेटे तर आभार प्रशांत कोळगे यांनी मानले.
0 टिप्पण्या