प्रतिनिधी...मनोज जाधव
खतांचे नमुने तपासणीसाठी छत्रपती संभाजी नगर येथे पाठवले
सर्जेराव गायकवाड यांचे उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित
तामलवाडी - प्रतिनिधी (दि.२५ ऑगस्ट)
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील (तेरणा व्हेली केमीकल आणि फर्टिलायझर व महीन्द्रा काॅर्प सायन्सेस) अशा दोन नावांनी सुरू असलेला बोगस खतनिर्मितीचा कारखाना जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार तीन महीन्यासाठी बंद करण्यात आला असुन जप्त केलेल्या खतांचे नमुने तपासणीसाठी छत्रपती संभाजी नगर येथे पाठवण्यात आले असल्याचे संबंधित अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले असल्याने सर्जेराव गायकवाड यांनी आपले उपोषण आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील गट नं ३९९ येथे महीन्द्रा काॅर्प सायन्सेस तसेच तेरणा व्हेली केमीकल आणि फर्टिलायझर या दोन नावाने एका पत्र्याच्या शेडमध्ये बोगस खतनिर्मितीचा कारखाना व सदरील खताची विक्री जोमात सुरू होती. याची माहिती तामलवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव गायकवाड यांना मिळाली त्यांनी त्या कारखान्यांमध्ये जाऊन पहाणी केली असता त्या ठिकाणी अनेक त्रुटी आढळुन आल्या व विशेष म्हणजे याच ठिकाणी गतवर्षी बोगस खताचा जवळपास सहा लाखाचा मुद्देमाल जप्त करुन तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला होता. नंतर संबंधित मालकाने संबंधित अधिकारी यांना हाताशी धरून अशी जादु केली की तो बोगस खताचा कारखाना त्याच जागेत पुन्हा सुरू झाला शेतकर्यांना लुबाडण्यास सुरुवात झाली. मात्र सर्जेराव गायकवाड यांनी जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांच्याकडे तो बोगस खतनिर्मितीचा कारखाना कायमस्वरूपी बंद करणेबाबत लेखी निवेदन सादर केले व उपोषणाचा इशारा दिला होता. जिल्हाधिकारी साहेब यांनी नवेदनाची दखल घेतली व कृषी विभागाच्या संबंधित अधिकारी यांनी सदरील कारखान्यावर छापा टाकून कारखान्यातील जवळपास १२ हजार ४०० खतांच्या गोण्या किमंत जवळपास १ कोटी रुपये ईतका माल ताब्यात घेतला व सदरच्या खतनिर्मिती व विक्रीसाठी कारखान्यावर तीन महीन्यांची बंदी घालण्यात आल्याचे कृषी विभागाच्या संबंधित अधिकारी यांनी सांगितले.
उपोषण तात्पुरते मागे, कारखाना कायमस्वरूपी बंद न झाल्यास तीव्र आंदोलन व केंद्रीय कृषिमंत्री, राज्यपाल साहेब यांना निवेदन देणार
---------------------------------------------
मा जिल्हाधिकारी साहेब यांनी सदरील बोगस खतनिर्मितीचा कारखाना तीन महान्याकरींता बंद करून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. प्रशासनाने केलेली प्राथमिक कार्यवाही योग्य असल्याने प्रशासनाचा मान राखत सर्जेराव गायकवाड यांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले आहे. परंतु जर हा बोगस खतनिर्मितीचा कारखाना कायमस्वरूपी बंद न झाल्यास तक्रारदार मा राज्यपाल साहेब व केंद्रीय कृषिमंत्री यांना याबाबत लेखी निवेदन सादर करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव गायकवाड यांनी सांगितले.
तक्रारदारास अहवालाची प्रत दिली नाही
कृषी विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात--------------------------------------------
तामलवाडी येथील त्या बोगस खतनिर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकून कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जवळपास १२ हजार चारशे खतांच्या गोण्या ज्यांची किमंत १ कोटी रुपये असुन तो खतनिर्मितीचा कारखाना व सदर खतविक्रीसाठी बंद करण्यात आल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्ररदारास तोंडी सांगितले व उपोषण आंदोलन मागे घेण्यासाठी निवेदन पाठवले. संबंधित अधिकारी यांनी प्राथमिक कार्यवाही करुन तोंडी सांगितले परंतु तक्रारदारास कारवाई केल्याची कसलेही लेखी दिले नसल्याचे तक्रारदार यांनी सांगितले.
0 टिप्पण्या