Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिवहन दिनानिमित्त मनस्वी ॲम्बुलन्सकडून आरोग्यसेवकांना सलाम


 

✍️ संपादक...मनोज जाधव 


आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिवहन दिनानिमित्त मनस्वी ॲम्बुलन्सकडून आरोग्यसेवकांना सलाम

धाराशिव :
आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिवहन दिनानिमित्त मनस्वी ॲम्बुलन्सतर्फे जीव धोक्यात घालून आरोग्यसेवेसाठी अहोरात्र तत्पर राहणाऱ्या ॲम्बुलन्स चालक, सेवाकर्मी, डॉक्टर्स व आपत्कालीन सेवा देणाऱ्या रुग्णसेवकांना मनःपूर्वक सलाम करण्यात आला.

अपघात, नैसर्गिक आपत्ती अथवा तातडीच्या आजारपणाच्या वेळी जीव वाचवण्यासाठी सायरन वाजवत धावणाऱ्या ॲम्बुलन्स सेवकांचे योगदान अमूल्य असल्याचे मनस्वी ॲम्बुलन्सने यावेळी नमूद केले.

संस्थेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या संदेशात म्हटले आहे की –
“जीव वाचवणे हेच आमचे धर्मकर्म आहे. वेळेवर सेवा, सुरक्षित प्रवास व समाजहित हेच आमचे ध्येय आहे. ‘तुमची सुरक्षितता आणि सेवा – आमची प्राथमिकता’ या तत्त्वावर आम्ही नेहमीच रुग्णसेवेसाठी तत्पर आहोत.”

परिवहन हे आधुनिक समाजाचे जीवनवाहन असून, त्यामध्ये वैद्यकीय परिवहन ही मानवी जीवन वाचवणारी सर्वात महत्त्वाची सेवा आहे, असेही मनस्वी ॲम्बुलन्सच्या वतीने सांगण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या