प्रतिनिधी....मनोज जाधव
📰 धाराशिव जिल्ह्यात खळबळ – रुईभर ग्रामपंचायत उपसरपंच संतोष सौदागर वडवले यांचा मराठा आरक्षणासाठी राजीनामा
धाराशिव :
धाराशिव तालुक्यातील रुईभर ग्रामपंचायतचे उपसरपंच संतोष सौदागर वडवले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वडवले यांनी आपला राजीनामा सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय रुईभर यांच्याकडे सादर केला.
आजवर मराठा आरक्षणाच्या प्रत्येक लढाईत सक्रिय सहभाग नोंदवणारे संतोष वडवले यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हा निर्णय घेतल्याचे सांगितले. मराठा समाजाच्या हक्कासाठी पुढाकार घेणे ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
वडवले यांच्या या पावलाने धाराशिव जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून मराठा समाजाकडून त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. ग्रामपंचायत स्तरावर दिलेला हा राजीनामा मराठा आंदोलनाला नवी दिशा देणारा ठरेल, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.
👉 मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात ग्रामपंचायत पातळीवरून दिलेला हा पहिला मोठा राजीनामा मानला जात असून त्यावर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे...
0 टिप्पण्या