Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

धो धो पावसातही गावोगाव जनजागृती;धाराशिव जिल्ह्यातील मराठा सेवकांची अखंड धडपड


 प्रतिनिधी....मनोज जाधव 


धो धो पावसातही गावोगाव जनजागृती;धाराशिव जिल्ह्यातील मराठा सेवकांची अखंड धडपड


धो धो पाऊस पडत असतानाही मराठा सेवकांनी मनोज जरांगे पाटलांचा आदेश शिरस्त्राण मानून "२७ ऑगस्ट चलो अंतरवली सराटी – २९ ऑगस्ट चलो मुंबई" या जनजागृती अभियानाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


धाराशिव जिल्ह्यात तब्बल ८४ टीम्स सकाळ-संध्याकाळ गावागावात जाऊन उत्साहात जनजागृती करत आहेत. जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील जवळजवळ ९८ टक्के गावे या अभियानाच्या कवेत आली असून, उर्वरित गावे पुढील दोन-तीन दिवसांत पूर्ण होणार असल्याचे मराठा सेवकांनी सांगितले.


गावोगावी पारंपरिक पद्धतीने हलक्या, ढोल, दवंडी काढत, समाज मंदिर, देवस्थान, तसेच मोकळ्या जागांमध्ये सभा घेत जनजागृती होत आहे. अनेक सेवकांनी आपल्या वाहनावर लाऊडस्पीकर बसवून गावागावच्या चौकाचौकात जाऊन मोर्चाबाबत माहिती पोहोचवली.


या कार्यक्रमांना केवळ मराठा बांधवच नव्हे, तर इतर समाजातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावकरी बांधवांकडून या टीम्सचे उत्साहात स्वागत होत असून, "मराठा आरक्षण जनजागृती" एक जनआंदोलनाचे स्वरूप घेत असल्याचे चित्र दिसत आहे.


२७ ऑगस्ट रोजी अंतरवली सराटीला आणि पुढे २९ ऑगस्ट रोजी मुंबईकडे हजारो वाहने जिल्ह्यातून निघणार असल्याचे स्पष्ट होत आहे. नोकरदार, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी अशा सर्वच क्षेत्रांतील मराठा बांधवांनी आपापली कामे पूर्ण करून पूर्ण ताकदीने मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सज्जता दाखवली आहे.


मराठा सेवकांनी जिल्ह्यातील जनजागृती कार्यात कोणतीही उणीव राहू नये यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून, गावोगावी दिसणारा उत्साह आगामी आंदोलनाला प्रचंड बळ देणारा ठरणार आहे.



---

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या