प्रतिनिधी...मनोज जाधव...
बरमगाव (बु.) येथे धरण ओव्हरफ्लो; गावात पूरस्थिती, प्रशासनाचा तातडीने शिताफीने बचावकार्य!
धाराशिव तालुक्यातील बरमगाव (बु.) गाव आज अतिवृष्टीमुळे अक्षरशः थरारले! पावसाचा जोर इतका वाढला की गावातील धरण ओव्हरफ्लो होताच क्षणार्धात गावात पूरस्थिती निर्माण झाली. मात्र, प्रसंगी धैर्य दाखवत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी धरणातील पाणी नियंत्रित पद्धतीने बाहेर काढत मोठा अनर्थ टाळला...
या जीवघेण्या परिस्थितीत भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव व माजी जि.प. सदस्य रामदास अण्णा कोळगे, बेंबळी पोलीस स्टेशनचे API गणेश पाटील, सरपंच बाळासाहेब गोरे, बळीराम शिरसाठे यांच्या सोबत इरिगेशन विभागाचे अभियंते, पोलीस यंत्रणा, तलाठी, ग्रामसेवक, MSEB अधिकारी व लाईनमन, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावकरी शिताफीने कार्यरत राहून दिलासा दिला....
दरम्यान, परिस्थितीची गंभीरता ओळखत तुळजापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार राणाजगजितसिंह दादा पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन तातडीची मदत उपलब्ध करून दिली, तर जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजारी यांनी यंत्रणांना सज्ज ठेवून पूरग्रस्तांना आवश्यक साहाय्य देण्याचे आदेश दिले...
👉 ग्रामस्थांच्या जीवितासोबत मोठ्या हानीचा धोका टळला असला तरी पिकांचे व जनावरांचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
गावकऱ्यांनी या संकटात जीवाची पर्वा न करता झटणाऱ्या प्रशासन, पोलीस व लोकप्रतिनिधींना सलाम करत मनःपूर्वक आभार मानले!
#अतिवृष्टी #पूरस्थिती #बरमगाव #धाराशिव





0 टिप्पण्या