प्रतिनिधी...मनोज जाधव
शेतकऱ्यांवर पावसाचा कहर, तात्काळ मदत न मिळाल्यास आंदोलनाची चेतावणी – प्रहार जनशक्ती पक्षाची मुख्यमंत्र्यांना मागणी
परंडा (प्रतिनिधी) – परंडा तालुक्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन तातडीने आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पक्षाने दिला आहे.
निवेदनातील ठळक मागण्या :
➡️ शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी.
➡️ कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
➡️ शेतीपिकांचे, घरांचे व जनावरांचे नुकसान झालेल्यांना तात्काळ पंचनामे करून मदत वाटप करावी.
➡️ पावसामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी पीडित कुटुंबांना ५० लाखांची मदत जाहीर करावी.
प्रहार जनशक्ती पक्षाने स्पष्ट केले आहे की, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले नाहीत तर शासनाला रस्त्यावर उतरून जाब विचारला जाईल. शेतकरी उद्ध्वस्त होत असताना सरकार बघ्याची भूमिका घेत बसले, तर तालुक्यात तीव्र आंदोलन होणार यात शंका नाही.
निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परंडा तालुका अध्यक्ष आप्पासाहेब तरटे तसेच जिल्हा उपाध्यक्ष दिनेश गुडे, मनोज पाटूळे रासपचे ज्येष्ठ नेते यांच्या सह्या आहेत



0 टिप्पण्या