Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

बार्शीपुत्र आयएएस रमेश घोलप यांचा स्तुत्य उपक्रम – तीन महिन्यांचे वेतन शेतकऱ्यांसाठी दान


 

प्रतिनिधी...मनोज जाधव 9823751412


बार्शीपुत्र झारखंड मधील कलेक्टर घोलप यांचा स्तुत्य उपक्रम – तीन महिन्यांचे वेतन शेतकऱ्यांसाठी दान

शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा, आत्महत्याग्रस्त कुटुंबांची करुण कहाणी आणि अतिवृष्टीने उध्वस्त झालेली शेती – या सगळ्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्याच्या महागावचा सुपुत्र आणि सध्या झारखंडमध्ये सेवेत असलेले आयएएस अधिकारी रमेश घोलप यांनी संवेदनशीलतेचा आदर्श उभा केला आहे. स्वतःच्या तीन महिन्यांच्या पगारातून तब्बल ₹५ लाखांची मदत त्यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केली आहे.




आत्महत्याग्रस्त कुटुंबांना थेट मदतीचा हात

प्रथम टप्प्यात, बार्शी तालुक्यातील कारी गावातील शेतकऱ्याच्या मुलीला आणि दहीटणे येथील एका शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी ₹१ लाख मदत घोलप दांपत्याने थेट सुपूर्द केली. ही मदत मुलांच्या शिक्षणासाठी फिक्स डिपॉझिट स्वरूपात ठेवण्यात आली असून, स्वप्ने पूर्ण करण्यासाठीचा भक्कम आधार ठरणार आहे.



कारी गावातील शेतकऱ्याची मुलगी पोलिस दलात जाण्याचं स्वप्न पाहते. “तिच्या पायात पैशाची अडचण अडथळा ठरू नये,” या भावनेतून ही मदत करण्यात आल्याचे श्री. घोलप यांनी सांगितले.


३० शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत मदत

फक्त दोनच नव्हे, तर बार्शी तालुक्यातील ३० शेतकऱ्यांना प्रत्येकी ₹१०,००० मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, ती मदत ते स्वतः दिवाळीच्या काळात वितरित करणार आहेत.




अन्नदाता संकटात – समाजाने पाठीशी उभं राहावं’

गेल्या काही आठवड्यांतील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, “शेतकऱ्यांच्या संकटकाळी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येणं गरजेचं आहे. फक्त आर्थिक नव्हे, तर भावनिक आधारही महत्त्वाचा आहे,” असे आवाहन श्री. घोलप यांनी केले.


संघर्षातून उभा राहिलेला लोकाभिमुख अधिकारी

गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन आयएएस पदापर्यंत पोहोचलेले रमेश घोलप यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. सध्या ते झारखंडच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे विशेष सचिव आणि जल जीवन मिशनचे मिशन डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत.
थेट जनतेत जाऊन काम करण्याच्या त्यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे त्यांना झारखंडमध्ये ‘गरीबांचा कलेक्टर’ म्हणून ओळखले जाते.


🌾 बार्शीचा हा सुपुत्र शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत असून, त्यांचा हा उपक्रम समाजातील इतरांना प्रेरणा देणारा आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या