*शासकीय स्त्री रुग्णालया शेजारील जागा रुग्णालयासाठी हस्तांतरित करण्याबाबत पालकमंत्री यांच्या कडे सुरक्षा समिती जिएमसीच्या वतीने मागणी केली असता पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारींना दिले आदेश..
धाराशिव :- शहरातील शासकीय महिला रुग्णालयाच्या शेजारील जागा ही स्त्री रुग्णालयाला हस्तांतरित करण्यात यावी जेणे करून रुग्ण व त्यांचे नातेवाईकांची गैरसोय होणार नाही यासाठी सुरक्षा समिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना चर्चा करुन निवेदन दिले असता पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना जागेच्या हस्तांतरणाचे आदेश देण्यात आले,समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की,या रुग्णालयात स्थानिकच नव्हे तर पर जिल्ह्यातील दुर दुर हुन गरोदर महिला बाळंतपण करण्यासाठी येतात,रुग्णालयातील अपुरी जागा, मोजकेच ६० खाट यापासुन रुग्ण यांची गैरसोय होते, तरिही येथील अधिकारी कर्मचारी रुग्णांना समाधान कारक चांगल्या पद्धतीने उपचार देण्याचा यशस्वी प्रयत्न करतात,सदर स.नं.२४१ मध्ये स्त्री रुग्णालय असुन याच स.नं.मधील रुग्णालयास लगत पुर्व बाजुस मोकळी असलेली शासनाची सहा गुंठे रिकामी जागा असुन ही जागा रुग्णालयास मिळाल्यास फायदेशीर ठरेल.यापूर्वी ही जागा स्त्री रुग्णालयासाठी हस्तांतरित करण्याबाबत शासकीय महिला रुग्णालया कडुन जिल्हा प्रशासनाकडे मागणी करण्यात आली असुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव यांच्याकडुन पाठपुरावा केला जात आहे,आम्ही देखील सन २०२३ पासुन जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठपुरावा करीत आहोत,या जागेचे हस्तांतरित लवकर झाले तर भविष्यात जागे संदर्भात अडचणी निर्माण होणार नाहीत.या जागेत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा शेड,पार्किंग व इतर सुविधा उपलब्ध होतील.या जागेचे हस्तांतरण शासकीय स्त्री रुग्णालयाकडे करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना सांगुन बाळंतपणासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होणार नाही यासाठी सहकार्य करावे असे लेखी निवेदन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना चर्चा करुन देण्यात आले,यावेळी सदस्य,सुरक्षा समिती,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अब्दुल लतीफ,सदस्य,सुरक्षा समिती,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गणेश वाघमारे,आरोग्य मित्र शेख रौफ,तर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,सिईओ मैनाक घोष,जिल्हा पोलीस अधीक्षक रितु खोकर,अधिष्ठाता डॉ शैलेंद्र चौहाण,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर,स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षका डॉ स्मिता गवळी,वैद्यकीय अधिक्षक डॉ.तानाजी लाकाळ,वैद्यकशास्त्र डॉ.विश्वजीत पवार,तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.ईस्माईल मुल्ला,डॉ राहुल वाघमारे,बालरोग तज्ज्ञ डॉ दिग्गज दापके,डॉ.सचिन रामढवे,डॉ संजय नलावडे,मेट्रन रिबेका भंडारी,मेट्रन सुमित्रा गोरे,सह इतर मान्यवर उपस्थित होते.


0 टिप्पण्या