Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

"टुडे (TODAY ) समाचारचे संपादक हुकमत मुलाणी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन;अंत्यविधी आज कोंड येथे होणार"


 "टुडे (TODAY ) समाचारचे संपादक हुकमत मुलाणी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन;अंत्यविधी आज कोंड येथे होणार"


धाराशिव:दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे "टुडे समाचार" चे संपादक हुकमत मुलाणी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.


हुकमत मुलाणी यांनी आपल्या लेखणीद्वारे स्थानिक प्रश्न, सामाजिक न्याय तसेच सर्वसामान्य जनतेचे आवाज ठळकपणे मांडले. त्यांच्या पत्रकारितेमुळे "टुडे समाचार" ला जनमानसात विशेष स्थान प्राप्त झाले होते. त्यांची सामाजिक जाण आणि सत्यनिष्ठ कामामुळे त्यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.


त्यांचा अंत्यविधी आज दुपारी कोंड येथे सायंकाळी ४ वाजता कोंड कब्रस्तान येथे होणार असून या वेळी कुटुंबीय,नातेवाईक, पत्रकार बांधव व स्थानिक नागरिक उपस्थित राहतील.


हुकमत मुलाणी यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या