Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

तामलवाडी प्रहार संघटने तर्फे प्रदेश अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांचा सत्कार


      प्रतिनिधी....सचिन शिंदे 

-------------------------------------------

  तामलवाडी - तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने प्रदेश अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांचा फेटा पुष्पहार शाल व श्रीफळ देऊन सहकुटुंब करण्यात आला सत्कार 

  यावेळी धर्मेंद्र सातव साहेब यांनी बोलताना सांगितले की प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय ओमप्रकाश ऊर्फ बच्चु भाऊ कडू याच्या होणाऱ्या शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा जिल्हा निहायक दौरा याविषयी चर्चा करण्यात आली व संघटना वाढीसाठी प्रयत्न करणे तसेच शासनाच्या योजने पासून एक हि दिव्यांग बंधू व भगिनी वंचित राहू नये त्यासाठी संघटनेने प्रयत्न करावे तसेच नवनिर्वाचित सदस्य यांच्या विषयी चर्चा केली ग्रामपंचायत कार्यालय यांच्या मार्फत मिळणारा पाच टक्के निधी वेळोवेळी पाठपुरावा करणे तसेच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आल्या यावेळी उपस्थित शिवसेना विभागाचे माजी गट प्रमुख मुकुंद गायकवाड तालुका संघटक सचिन शिंदे नागेश शिंदे किसन पांडागळे शशिकांत गायकवाड अमोल घोटकर बबन राऊत हणमंत लोंढे दशरथ भाकरे तसेच प्रहार सैनिक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या