प्रतिनिधि...मनोज जाधव
*धाराशिवमध्ये प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव यांचा सत्कार*
बच्चुभाऊंच्या दौऱ्याची व नागपूर आंदोलनाची तयारीचा आढावा
धाराशिव : तुळजाभवानी मातेच्या दर्शनानिमित्त प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्याध्यक्ष माननीय धर्मेंद्रजी सातव हे परिवारासह धाराशिव दौऱ्यावर आले. त्यांच्या या आगमनावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचे जिल्ह्यात हार्दिक स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी धर्मेंद्र सातव यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन २८ सप्टेंबर रोजी बच्चुभाऊ यांच्या नियोजित दौऱ्याची माहिती घेतली. तसेच २८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या आंदोलनाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख, जिल्हा पदाधिकारी व शाखाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील व महेश माळी, जिल्हा सचिव महादेव चोपदार, जिल्हा कार्याध्यक्ष महादेव खंडाळकर, शहराध्यक्ष जमीर शेख, धाराशिव-कळम तालुका संपर्कप्रमुख इंद्रजीत मिसाळ, तालुका अध्यक्ष बाबासाहेब भोईटे, तालुका समन्वयक दिनेश पोतदार, तालुका उपाध्यक्ष तानाजी मगर, तुळजापूर तालुका प्रमुख मारुती पाटील, तुळजापूर उपतालुकाप्रमुख दादा जाधव, धाराशिव शहर संघटक सचिन जाधव, उपशहराध्यक्ष महबूब तांबोळी तसेच प्रकाश खडके, सागर पाटील, अक्षय पवार, ओंकार पवार, भगवान भोगले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या वतीने धर्मेंद्र सातव यांना मानाचा फेटा घालून सत्कार करण्यात आला. तसेच याच प्रसंगी त्यांना ‘प्रहार पर्व’ या वृत्तपत्राचे अधिकृत पत्रकार म्हणून ओळखपत्र प्रदान करण्यात आले.


0 टिप्पण्या