📰 चिखली गावाचा विजयी जल्लोष : आंदोलनातही सेवा, आरक्षणानंतर मिरवणुकीतही ऐक्याचा गजर
धाराशिव जिल्ह्यातील चिखली गावातील तरुणांनी मुंबई येथील आझाद मैदानावरील मराठा आंदोलनात फक्त जल्लोषच केला नाही तर आंदोलक मराठा बांधवांना अन्नपाण्याची व्यवस्था, रस्त्यांची स्वच्छता व वाहतूक यंत्रणेला मदत अशा अनेक सेवा कार्यातही मोलाचा हातभार लावला.
आरक्षणाचा विजय मिळाल्यानंतर गावात परतल्यावर तरुणांनी भव्य विजयी मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला. या मिरवणुकीत केवळ मराठा समाज नव्हे तर सर्व जाती-धर्मातील ग्रामस्थ सहभागी झाले.
ग्रामपंचायत चिखलीने देखील आंदोलनकर्त्यांना सक्रीय पाठिंबा देत रीतसर ठराव मंजूर करून सरकारसमोर दणका दिला. या ठरावामुळे आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे मुख्यमंत्र्यांचे डोळे उघडले असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण आंदोलनातून व विजय सोहळ्यातून चिखली गावाने दाखवून दिले की आरक्षणासाठीचा लढा हा केवळ हक्कासाठीचा नाही तर सेवाभावी वृत्ती आणि ऐक्याची ताकद दाखवणारा असून आझाद मैदान येथे चिखली येथील आंदोलक समाधान मते,विकास जाधव,सिद्धेश्वर गवळी,सचिन जाधव,मच्छिंद्र घोडके,अजय जाधव,विकास गोडसे,रत्नदीप नरवडे,बालाजी जाधव असे शेकडो आंदोलकांनी यावेळी सहभाग नोंदवला




0 टिप्पण्या