प्रतिनिधी...मनोज जाधव
रुईभर : - दि 5 सप्टेंबर रोजी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर शाळेचा माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सन - 2024-25 साली तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल शिक्षण विभाग पंचायत समिती धाराशिव तर्फे तालुका शिक्षक पुरस्कार सोहळा जिल्हा परिषद कन्या प्रशाला, धाराशिव येथे सत्कार ठेवला होता. याप्रसंगी माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत तालुकास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल सन्मान करण्यात आले.
धाराशिवचे विद्यमान खासदार मा श्री ओमराजे निंबाळकर, शिक्षक आमदार मा श्री विक्रम जी काळे, कळंब विधानसभेचे विद्यमान आमदार मा श्री कैलास पाटील साहेब उपस्थित होते.
जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर शाळेने माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवल्यामुळे प्राचार्य जयप्रकाश कोळगे व सर्व सहकाऱ्यांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी श्री संतोष नलावडे, (गटविकास अधिकारी, वर्ग -१ , पंचायत समिती, धाराशिव ) , श्री सय्यद असरार अहमद ( गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, धाराशिव ) , श्रीमती दैवशाला हाके विस्ताराधिकारी (गटशिक्षण कार्यालय, धाराशिव ) , श्री मल्हारी माने विस्ताराधिकारी उपस्थित होते.
या सन्मान सोहळ्यासाठी डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार यांनी अभिनंदन केले.
0 टिप्पण्या