Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

शिक्षक दिनाचे औचित्य साधत माजी विद्यार्थ्याकडून गुरूंचा सन्मान


प्रतिनिधी...मनोज जाधव 
 

📰 आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित वसंत पाटील सर – माजी विद्यार्थ्यांकडून जल्लोषात अभिनंदन


गट शिक्षण कार्यालय उस्मानाबाद यांच्या तर्फे दिला जाणारा तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी आदरणीय गुरुवर्य श्री. वसंत पाटील सर यांना जाहीर झाला. शिक्षक दिनाचे औचित्य साधत झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला.

विशेष म्हणजे या सोहळ्यास वसंत पाटील सरांचे माजी विद्यार्थी व सध्या धाराशिव–कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास दादा पाटील हे देखील आवर्जून उपस्थित राहिले. सरांचा सन्मान होत असल्याचे पाहून त्यांचे माजी विद्यार्थी आणि उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला.

सरांच्या या यशाबद्दल त्यांचे माजी विद्यार्थी, स्थानिक नागरिक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान आदर्शवत असल्याचे सर्वांनी नमूद केले.

🌺 संपूर्ण माजी विद्यार्थ्यांकडून वसंत पाटील सरांना हार्दिक हार्दिक अभिनंदन! 🌺



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या