Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

भ्रष्टाचार निर्मूल समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश


     प्रतिनिधी....मनोज जाधव 


तुळजापूर (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्ह्यातील भ्रष्टाचार निर्मूल समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धती व जनतेप्रती असलेल्या बांधिलकीतून प्रेरणा घेत तसेच पक्षाचे सचिव संजय मोरे,उपनेते ज्ञानराज चौगुले,पालकमंत्री प्रताप सरनाईक,सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्या मार्गदर्शनाने आणि तुळजापूर तालुका प्रमुख अमोल जाधव व महिला आघाडी मीनाताई सोमाजी यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला.


शिवसेना युवा जिल्हाप्रमुख गणेश जगताप यांच्या शुभहस्ते गणेश पाटील यांचा जाहीर प्रवेश झाला.पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये गणेश पाटील यांच्यासोबत मुकुंद मर्डे,किरण मर्डे,श्रीलेश मुळे,सैफन शेख,भागवत बरगडे,सारिका चुंगे,विश्वजीत लंगडे,समाधान डोलारे,यश जगताप,शिवम काठेवाड,दुर्गेश दळवी,प्रणव चव्हाण यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला.


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा ठरत असून पाटील यांचा युवकांमध्ये मोठा प्रभाव असल्याने जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढणार आहे,अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.


या प्रसंगी तुळजापूर तालुका प्रमुख अमोल जाधव,शहर उपप्रमुख रमेश चिवचिवे,संजय लोंढे,नितीन मस्के,सौरभ भोसले,जिल्हा महिला आघाडी मीनाताई सोमाजी,शहाजी हाके,स्वप्निल सुरवसे,संभाजी नेपते,गौरव साळुंखे,पिटू कराडे,निखील अमृतराव यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


गणेश पाटील यांनी आपल्या प्रवेशावेळी भ्रष्टाचाराविरोधातील लढा जनतेच्या हितासाठी आता शिवसेनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे सुरू राहील,असा विश्वास व्यक्त केला. तर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नव्या प्रवेशकांचे उत्साहात स्वागत करत आगामी निवडणुकांमध्ये पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या