गेली महीनाभरापासून घंटागाडी बंद, कचरा रस्त्यावर
दोन दिवसात घंटागाडी चालू करा अन्यथा.....
तामलवाडी - प्रतिनिधी ...सचिन शिंदे
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील घंटागाडी गेली महीनाभरापासुन बंद असल्याने नागरीक रस्त्यावर कचरा टाकत असुन रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरलले दिसुन येत आहे.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने १४ वा वित्त आयोगाच्या निधीमधून गावातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीची सोय करण्यात आली. घंटागाडी आल्याने व्यवस्थितपणे कचर्याची विल्हेवाट लावली जात होती परंतु कुठे माशी शिंकली आणि अचानक घंटागाडी बंद झाली. गेली महीनाभरापासुन घंटागाडी बंद झाली असून नागरीकांनी साचवुन ठेवलेला कचरा आता रस्त्यावर येऊ लागला आहे. रस्त्यावर कचर्याचे ढीग साचत आहेत. सध्या नवरात्रोत्सवाचे दिवस आहेत घरामध्ये स्वच्छता चालु आहे व त्याचा अधिकचा कचरा साचत असल्याने कचरा टाकण्यासाठी रस्त्याचा वापर करण्यात येत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने तो कचरा ओला होऊन दुर्गंधी पसरत असुन नागरीकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तर यामुळे गावांमध्ये रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला असुन गावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे रस्त्यावर पडणाऱ्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी घंटागाडी दोन दिवसात सुरू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव गायकवाड यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अन्यथा कचरा ग्रामपंचायत कार्यालयात टाकण्याचा ईशारा
---------------------------------------------
तामलवाडी गावातील कचरा रस्त्यावर पडत असल्याने दोन दिवसात घंटागाडी सुरू करावी अन्यथा घरातील कचरा ग्रामपंचायत कार्यालयात टाकुन आंदोलन करु असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव गायकवाड यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
सरपंच, उपसरपंच यांचे याकडे दुर्लक्ष तर ग्रामविकास अधिकारी गायब
---------------------------------------------
नवरात्रोत्सवाचे दिवस आहेत, घंटागाडी अभावी कचरा रस्त्यावर पडुन दुर्गंधी पसरत आहे परंतु याचे सरपंच, उपसरपंच यांना काहीच देणेघेणे नाही असे दिसत आहे. तर ग्रामविकास अधिकारी साहेब गेली पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायतीकडे फिरकलेच नसल्याने यांना बोलणार कोण? असा सवाल उपस्थित करुन साहेब कुठे गायब झालेत,गावच्या समस्यांकडे ते दुर्लक्ष करत असल्याचे नागरीकांमधुन बोलले जात आहे.




0 टिप्पण्या