विविध क्रिडा स्पर्धेमधून जयप्रकाश विद्यालयाचा ४५ वा विद्यार्थी या शैक्षणिक वर्षात विभागीय पातळीवर
रुईभर :- दि 16 सप्टेंबर रोजी - जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची क्रीडा क्षेत्रात यशाची परंपरा कायम ठेवत सन-2025-26 या शैक्षणिक वर्षात विविध क्रिडा स्पर्धेमधून ४५ व्या विद्यार्थ्याची विभागीय पातळीवर निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव द्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धा सन 2025- 26 वर्षातील दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकणारा आडे सुयश सुनील याचा जिल्हास्तरावर दुसरा क्रमांक येऊन विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्याबद्दल प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी अभिनंदन केले.


0 टिप्पण्या