Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

धाराशिवमध्ये पावसाचा कहर! नगरपालिका समोरील शॉपिंग सेंटर झाले जलमय; दुकानदारांचे लाखोंचे नुकसान


 

   प्रतिनिधी...मनोज जाधव 


धाराशिवमध्ये पावसाचा कहर! नगरपालिका समोरील शॉपिंग सेंटर झाले जलमय; दुकानदारांचे लाखोंचे नुकसान

धाराशिव :


धाराशिव शहरात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून नगरपालिका समोरील शॉपिंग सेंटर पाण्याखाली गेले आहे. पावसाचे पाणी थेट दुकानात घुसल्याने व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.



नगरपालिका प्रशासनाचे बेफिकीरीपण आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. शासनाने व नगरपालिकेने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी संघटनांनी दिला आहे.



व्यापाऱ्यांच्या या आक्रोशामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, आता नगरपालिकेचे अधिकारी व शासन काय भूमिका घेते याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या