*. प्रतिनिधी...मनोज जाधव
धाराशिव :- मतदार जनजागरण समितीच्या वतीने ७७ वा हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील हैद्राबाद मुक्ती संग्राम हुतात्मा स्मारक स्तंभास मतदार जनजागरण समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.या स्तंभावर दोन्ही बाजुतील एकीकडे शहिदांच्या नावाचा तर दुसऱ्या बाजुला भारतीय संविधान उद्देशिका कोरलेला शिलालेख स्मृती स्तंभ असुन कदाचित हा धाराशिव शहरातील एकमेव स्मृती स्तंभ आहे. हा स्तंभ शहरातील जुन्या चमन बाग प्रचलित स्थळी होता. काही कारणास्तव समता नगर येथील नव्याने झालेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानात हा हलविण्यात आला. परंतू हा शासनाच्या नजरेतून दुर्लक्षित आहे. या स्तंभावर १३ हुतात्म्यांची नावे कोरलेली असून ८ नंबरचे मौजे काजळा येथील किसन राघु मांग (शिंदे) असे नाव असून रझाकारांनी त्यांचा कोथळा बाहेर काढल्याने ते हुतात्मा झाले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प चक्र अर्पण केले तर भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी हुतात्मा किसन राघु शिंदे यांचे नातलग वारस मोहन हरिबा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते तथा मतदार जनजागरण समिती कार्याध्यक्ष गणेश वाघमारे,आदर्श शिक्षक राजेंद्र धावारे,मार्गदर्शक सदस्य बलभीम कांबळे,सहसचिव बाबासाहेब गुळीग, उपाध्यक्ष संजय गजधने,उपस्थित होते. सूत्रसंचलन गणेश वाघमारे यांनी तर आभार बाबा गुळीग यांनी मानले.


0 टिप्पण्या