जयप्रकाश विद्यालयात इंदिरा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
रुईभर: - दि 19 नोव्हेंबर रोजी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रुईभर येथे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती माजी जि प सदस्य रामदास अण्णा कोळगे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी लहानपणापासूनच धाडसी होत्या अगदी लहान वयापासूनच देश सेवेचे धडे कुटुंबातूनच भेटले होते. देशातील गरिबी अगदी जवळून पाहिली होती. देशातील गरिबी दूर करण्यासाठी अनेक योजना त्यांनी आपल्या पंतप्रधान कार्यकाळात राबवल्या. शेती, उद्योगधंदे, व्यापार यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या कार्यकाळात बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले. विविध क्षेत्रात संशोधनाला प्रोत्साहन देण्यात आले. नैसर्गिकरित्या येणाऱ्या संकटांना धाडसाने सामना करत देशाच्या संरक्षणाविषयी त्या कसल्याही प्रकारची तडजोडी करत नसत. आपल्या कार्याचा प्रभाव पूर्ण देशांमध्ये दिसत होता. विदेशातील व्यापार नीतीवर ही त्यांची आपली छाप दिसून येते. असे अनेक कार्यातून त्यांच्या कामाचा लेखाजोखा खरोखरच प्रशांसनीय आहे. त्यांच्यातील कार्यपद्धती समजून घेऊन आपणही देश सेवा करावी असे अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश शेटे तर आभार श्री अरुण माने यांनी केले.


0 टिप्पण्या