*दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील सहभागाबद्दल ॲड जयश्री तेरकर यांचा बार कौन्सिल तर्फे सत्कार..
मुख्य संपादक..मनोज जाधव 9823751412
धाराशिव :- धाराशिव जिल्हा बार असोसिएशनच्या सदस्य असलेल्या ॲड जयश्री तेरकर यांनी दिल्ली येथे नुकतेच पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील खुल्या कवी संमेलनात आपल्या कवितेचे सादरीकरण करुन आपल्या प्रतिभेने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सुप्रसिद्ध साहित्यिक श्री शरद गोरे व आयोजक श्री संजय नहार यांच्या माध्यमातून सुप्रसिद्ध कवी युवराज नळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या खुल्या कवी संमेलनात सहभाग नोंदवल्या बद्दल धाराशिव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड प्रसाद जोशी यांच्या हस्ते ॲड जयश्री तेरकर यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी धाराशिव बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड प्रसाद जोशी उपाध्यक्षॲड किरण चादरे , ॲड नामदेव तेरकर, कोषाध्यक्ष ॲड.अजय पाटील तसेच महिला विधिज्ञ ॲड. कल्पना ताकभाते ॲड. वर्षा बांगर ॲड.सारिका पाटील ॲड.स्नेहा गायकवाड व अन्य विधिज्ञ मंडळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या