Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

उस्मानाबाद धाराशिव करांनो एकात्मतेच्या आदर्शाला तडा जाऊ देऊ नका.. सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे.

*उस्मानाबाद धाराशिव करांनो एकात्मतेच्या आदर्शाला तडा जाऊ देऊ नका..* सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे...

मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412

*धाराशिव - औरंगजेबाच्या कबरी वरुन महाराष्ट्रात जे वादंग माजले आहे त्यास तुम्ही बळी पडू नका,काही जण म्हणतात की,छावा चित्रपटा मुळे हे बाहेर आले आहे,परंतु छावा चित्रपट हा सध्या प्रदर्शित झाला आहे,छावा नावाची कांदबरी शिवाजी सावंत लिखित सन १९७९ रोजी प्रकाशित झाली,त्यावेळी ती प्रचंड गाजली परंतु आजच्या सारखे वादंग उठले नाही, कांदबरी वाचन करतांना त्यावेळी अनेकांना ही चिड आलीच असेल परंतु इतिहास जमा म्हणुन आजची परिस्थिती निर्माण झाली नाही, आमच्या राजाला छळणा-या क्रुरकर्मा विषयी आम्ही त्या व्यक्तीविषयी सद्भावना कशी दाखविणार..? परंतु आम्ही चिडखोर,कायदा हातात घेऊ इतर जाती धर्माचा द्वेष याचेही समर्थन करणार नाही,काही मंत्री नेते चिथावणी देणारे भाष्य करीत आहेत आणि शांतता सुव्यवस्था बिघडवित आहेत,ते तिथेच थांबले पाहिजे,ते तुम्हाला डिवचतील,तुमच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न करतील परंतु तुम्ही ठाम रहा, कोणत्याही भडकाऊ वातावरणात सामिल होऊ नका,ते परत परत तुम्हाला त्याच रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न करतील तुम्ही मात्र गपगुमान आपल्या धाराशिवचा आपल्या उस्मानाबादच्या एकीचा आदर्श तोडु नका,जाती धर्माचा उच्छांद माजवु नका,धाराशिवची आदर्शवत चळवळ व ओळख अख्खा महाराष्ट्र ओळखतो तो तसाच कायम राहु द्या,कोणत्याही क्षेत्रातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जातीच्या नावाखाली गैरसमज पसरु नये,महाराष्ट्रामध्ये आज राजकीय खेळी म्हणुन किंवा भावना व्यक्त म्हणून औरंगजेब यांची कबर व अफजल खान यांची कबर याबद्दल जे द्वेषयुक्त वातावरण निर्माण करीत आहेत त्यापासुन आपण सावध राहिले पाहिजे,शांततेने विश्वासाने आणि खात्रीशीर भाव ओळखुनच वक्तव्य करावे,अखंड भारताच्या इतिहासाला आपण का डावलत आहोत याचा विचार होणे गरजेचे असुन छत्रपती शिवाजी महाराज असतील या औरंगजेब यांचा इतिहास विसरला जाऊ शकत नाही, तो क्रूर होता हा इतिहास आपल्याला ठामपणे सांगतोच,परंतु आपण त्यात गुंतुन रस्त्यावर येऊन कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजेत,सण उत्सवाचे दिवस आहेत शांततेने पार पाडले पाहिजेत,छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी नव्हते तर ते स्वराज्यासाठी मुस्लिम साम्राज्यांशी लढा देत होते.तुम्ही कोणाच्या बोलण्यातुन उगीच पोलीस केसेस मध्ये अडकु नका, उज्ज्वल भविष्यासाठी कुटुंब परिवारासाठी तुम्ही किती महत्त्वाचे आहात याचा विचार करा,माझे गाव माझा जिल्हा,माझ्या महाराष्ट्राचा या देशाचा विकास कशा रितीने होईल यावर लढा द्या.. महापुरुषांनी कधीच धर्म वंश भाषा पंथ वर्ण वेश याकडे पाहिले नाही, त्यांनी पाहिले फक्त मानवते कडे त्यांच्या हक्कांकडे..त्यांना न्याय मिळवुन देण्याकडे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या