प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव तालुक्यातील मेडशिंगा गावात मोठ्या प्रमाणावर हंगामी व बागायती शेती केली जाते. गाव तसं धाराशिव शहरापासून 12 ते 13 किलोमीटर अंतरावरच आहे परंतु गावातील लोकसंख्येपैकी बहुसंख्येने शेतकरी असल्या कारणास्तव त्यांना शेतीसाठी लागणारे खते बी बियाणे व औषधे व इतर साहित्य खरेदीसाठी धाराशिव शहरातच जावे लागते त्यावेळी त्यांचा दिवसभराचा खराब होतो व सामान खरेदीसाठी जाताना व येताना वाहनांची सोय नसल्याने मोठी हेळसांड होते आणि हीच बाब लक्षात घेऊन मेडशिंगा येथील तरुण युवक उद्योजक असलेला करण रणदिवे यांनी गावात आज शिवशाही कृषीशक्ती या नावाने शेतीसाठी लागणाऱ्या खते बी बियाणे व औषधांचे दुकान जनतेच्या सेवेसाठी खुले केले असून त्याचाच आज भव्य शुभारंभ बेंबळी जिल्हा परिषद मतदार संघाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव श्री रामदास अण्णा कोळगे यांच्या हस्ते व मेडशिंगा गावचे सरपंच अनुरथ दूधभाते यांच्या उपस्थितीत उद्घाटन व भव्य शुभारंभ करण्यात आला....
यावेळी त्यांच्यासोबत राजेंद्र भणगे अशोक माळी किशोर कोळगे हनुमंत मोरे सर प्राध्यापक नानासाहेब पवार व अशोक पवार भारतीय जनता पार्टी चे तालुका उपाध्यक्ष काकासाहेब शेलार गावातील सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच उपसरपंच व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांच्यासह शेकडो शेतकरी या भव्य शुभारंभाच्या कार्यक्रमास हजर होते....
गावातच शेतीसाठी उपयुक्त असलेल्या सर्व साहित्याची खरेदीची सोय झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे


0 टिप्पण्या