प्रतिनिधी...मनोज जाधव
"तुळजापूर येथे महाविकास आघाडीच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन जुने बस स्थानक परिसरातील निकृष्ट दर्जाच्या टेन्शन फॅब्रिक कामाच्या निषेधार्थ करण्यात आले.महाविकास आघाडीच्या वतिने आरोप करण्यात आले की या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून कामाचा दर्जा अत्यंत सुमार असून खर्चही निविदेतील रकमेपेक्षा दुप्पट दाखवण्यात आला आहे."
"या संपूर्ण प्रकारात महाराष्ट्र शासनाची व परिवहन महामंडळाची फसवणूक झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीकडून जबाबदार अधिकारी, ठेकेदार व संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे."
"या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून ‘बोंब मारो आंदोलन’ छेडण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि शासन विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या."
"या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता यावर शासन काय पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे."


0 टिप्पण्या