Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

किरण नागनाथ शीत्रे यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न...


 

         प्रतिनिधी....मनोज जाधव 


SEBC प्रवर्गातून शिक्षण सेवकपदी निवड; मनोज जरंगे पाटील यांचे भावनिक आभार



अकोला : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून श्री किरण नागनाथ शीत्रे यांची एस.ई.बी.सी. (SEBC) प्रवर्गातून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, अकोला येथे शिक्षण सेवक पदावर निवड झाल्याबद्दल त्यांच्या गावाकडून त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.



सत्कार समारंभात बोलताना किरण शीत्रे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरंगे पाटील यांचे विशेष आभार मानले. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “जरंगे पाटलांच्या आंदोलनामुळेच आज मला ही संधी मिळाली,” असे बोलताना त्यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या भावना मान्य केल्या.



या कार्यक्रमाला अनेक मान्यवर, ग्रामस्थ व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. किरण शीत्रे यांच्या या यशाबद्दल संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, ही निवड समाजासाठी आणि तरुणांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या