प्रतिनिधी....मनोज जाधव
भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा सरचिटणीस पदी प्रदीप शिंदे यांची निवड होताच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्या कार्यतत्परता, जनसंपर्क क्षमता आणि संघटन कौशल्याची दखल घेत ही महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपविली आहे.
यापूर्वीही प्रदीप शिंदे यांनी पक्षातील विविध जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. पक्षाने दिलेली प्रत्येक जिम्मेदारी त्यांनी निष्ठेने आणि इमानदारीने पूर्ण केल्यामुळे कार्यकर्त्यांत त्यांचा विश्वासार्ह नेता म्हणून ठसा उमटला आहे.
वाघोली पंचायत समिती गणातून विक्रमी मतांनी निवडून येण्याचा मान मिळवून त्यांनी स्थानिक पातळीवर आपला प्रभाव सिद्ध केला आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील पक्ष संघटन अधिक बळकट होऊन जनतेशी नाळ अधिक दृढ होईल, असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
0 टिप्पण्या