Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

रुईभर येथील श्री. स्वामी समर्थ महाविद्यालयातील सुजित शिंदे यांची मुंबई पोलीस पदी निवड


 

       प्रतिनिधी....मनोज जाधव 


       रुईभर :- दि. 11 ऑगस्ट 2025  रोजी श्री. स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय रुईभर, येथील कला शाखेतील सुजित शिंदे यांची मुंबई पोलीस चालक पदी निवड झाली. धाराशिव तालुक्यातील दाऊतपुर या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील सुजित वैजनाथ शिंदे यांनी जिद्द, चिकाटी, व सातत्याने प्रयत्न यामधून अत्यंत कठीण व स्पर्धात्मक परिक्षेत शारीरिक चाचणीमध्ये 50 गुणांपैकी 44 गुण व लेखी परीक्षेत  100 गुणांपैकी 89 गुण अशी एकूण 133 गुण प्राप्त करून एन. टी. सी या प्रवर्गातून मुंबई पोलीस चालक पदी यश मिळवले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री सुभाष दादा कोळगे यांच्या हस्ते व शाॅल व बुके देऊन सत्कार करून त्यांना भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

       याप्रसंगी डॉ माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.   

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश शेटे यांनी तर आभार श्री     यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या