Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

लोहारा येथील विजेच्या समस्येबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी



      प्रतिनिधी....मनोज जाधव 


 लोहारा येथील विजेच्या समस्येबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी


लोहार (धाराशिव) – लोहार येथील महावितरण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या खेड, हिप्परा (रवा), वडगाव (गा), सुपतगाव, साळेगाव व तुगाव या गावांमध्ये MVA ऊर्जा क्षमतेने उपकेंद्र सबस्टेशन मंजूर करण्यासाठी तात्काळ मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महादेव धारुळे यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


महादेव धारुळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित गावांमध्ये शेतकरी व ग्रामस्थांना अपुऱ्या विजेचा पुरवठा व कमी दाबाचा विजेचा ताण यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. शेतीसाठी पाणी पंप, मोटार, शेतातील विजेची उपकरणे योग्य प्रकारे चालत नसल्याने शेती पिकांचे नुकसान होत असून, ग्रामस्थांचे दैनंदिन जीवनही विस्कळीत होत आहे.


अपुरा व कमी दाबाचा वीजपुरवठा हा अनेक वर्षांपासून सुरू असून, त्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम होतो आहे. या पार्श्वभूमीवर वीज क्षमतेत वाढ करण्यासाठी MVA ऊर्जा क्षमतेचे नवीन उपकेंद्र मंजूर करून द्यावे, अशी ठाम मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या