प्रतिनिधी ....मनोज जाधव
धाराशिव तहसीलदारांवरील तक्रारी वाढल्या; तपास सुरू असताना पालकमंत्र्यांचा सत्कार वादग्रस्त
धाराशिव :
धाराशिव तहसील कार्यालयात शेत रस्त्याची हजारो प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित असून, शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अलीकडेच धाराशिवला आलेल्या महसूलमंत्र्यांकडे सर्वाधिक तक्रारी या धाराशिव तहसीलदारांविषयीच दाखल झाल्या होत्या.
याशिवाय, एन. ए. लेआउटमधील अनियमितता व कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणी त्यांच्यावर तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांच्या मते, जबाबदार पदावरील अधिकाऱ्यावर गंभीर आरोप असताना, तपास पूर्ण होण्यापूर्वी अशा प्रकारे सन्मान करणे हे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे करते.
स्थानिक शेतकरी व नागरिकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत, अशा कृतींमुळे तक्रारदारांच्या भावनांवर पाणी फिरत असल्याने जनतेमधून संताप व्यक्त होत आहे
0 टिप्पण्या