प्रतिनिधी...मनोज जाधव
रुईभर : - दि १५ ऑगस्ट रोजी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयात सकाळी ७.३५ वाजता विद्यालयाचे माजी विद्यार्थी क्रांतीदीप दत्तात्रय बनसोडे, भारतीय सशस्त्र सेना दलामध्ये हवालदार पदावर कार्यरत रुईभरचे सुपुत्र यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नंतर गावात प्रभात फेरी काढण्यात आली शिस्तीचे पालन करत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गाऊन स्वातंत्र्याच्या घोषणा उत्साहात दिल्या.
याप्रसंगी डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, पालक , ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा प्रशांत कोळगे यांनी केले.
0 टिप्पण्या