धाराशिव...
आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन हिंदुस्तान कृषी सेवा केंद्र,धाराशिव येथे साजरा झाला.कार्यक्रमाचे प्रमुख आतिथी मेजर राजेंद्र ज्ञानदेव चव्हाण - मराठा लाईट इन्फंड्री 16 बटालियन चे माजी सैन्य अधिकारी आणि प्रगतशील डाळिंब बागायतदार हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला .तसेच कार्यक्रमाचे आयोजक माननीय मधुकर बलभीमराव सावंत,संचालक हिंदुस्तान कृषी सेवा केंद्र,धाराशिव ,माननीय भुतेकर साहेब - तालुका गुणनियंत्रण अधिकारी,धाराशिव .माननीय माधवराव शिंदे,मयूर ट्रेडर्स धाराशिव. तसेच माननीय शरद ज्ञानदेव लोखंडे,बलवर्धन फर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेड,मराठवाडा विभाग प्रमुख आणि इतर सर्व कृषी सेवा केंद्र संचालक धाराशिव कार्यक्रमासाठी उपस्थित होते याप्रसंगी हरिश्चंद्र कदम,पृथ्वीराज मुंडे आणि हुसेन शेख यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आणि कार्यक्रम यशस्वी केला.


0 टिप्पण्या