Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

धाराशिव चे गणपती विसर्जन यंदा मुंबईत होणार प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी


     प्रतिनिधी....मनोज जाधव 

धाराशिव : श्री गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रशासनाला निवेदन

धाराशिव (ता. 25 ऑगस्ट) – अखंड मराठा समाज, धाराशिव यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या 14 ऑगस्ट 2025 रोजीच्या जी.आर. नुसार गणेशोत्सव हा राज्य उत्सव साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने धाराशिव शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत आवश्यक नियोजन करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गणेश विसर्जनाची मिरवणूक 27 ऑगस्ट रोजी होणार असून विसर्जनासाठी जाणाऱ्या मार्गांवर विविध सांस्कृतिक उपक्रम – दहीहंडी स्पर्धा, भजन, कीर्तन, नृत्यस्पर्धा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्यामुळे गर्दी नियंत्रण, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, वीज व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच स्वच्छता या बाबींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.



तसेच विसर्जन मार्ग हा अंतरवली सराटी, आळेफाटा नगर मार्ग, शिवनेरी,  मार्ग, मुंबई मार्ग असा निश्चित करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

अखंड मराठा समाजाचे पदाधिकारी, ग्रामसेवक व गावकऱ्यांनी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलून मिरवणूक सुरळीत पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

👉 जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच तहसीलदार यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या