प्रतिनिधी...मनोज जाधव
धाराशिव :- मुख्याधिकारी निता अंधारे यांनी नुकताच नगरपालिकेचा पदभार स्वीकारला याबद्दल मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान जनजागरण उपक्रमात भारतीय संविधान उद्देशिका,विश्लेषण प्रत व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संसद मधील भाषण व त्यांचा जीवन क्रम हे छोटेसे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. हर घर संविधान या उपक्रमाच्या अनुषंगाने शासनाच्या वतीने हर घर संविधान या उपक्रमात संविधान उद्देशिका वाटप करण्यात येत असून या उद्देशिका बरोबरच उद्देशिका विश्लेषण प्रतीचे देखील वाटप करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली व यासह मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त करित असलेल्या भारतीय संविधान जनजागृती व दि.२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त शहरातून भव्य अशी संविधान जनजागृती रॅली काढण्यात येते यासह अनेक विषयावर चर्चा देखील करण्यात आली,यावेळी मतदार जनजागरण समितीचे सचिव अब्दुल लतीफ, कार्याध्यक्ष गणेश वाघमारे कोषाध्यक्ष शेख रौफ,नवज्योत शिंगाडे सह इतर उपस्थित होते.
0 टिप्पण्या