प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव : मराठा समाजाच्या हक्कासाठी झुंजणारे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे उद्या दि. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल राजासाब, धाराशिव येथे आगमन करणार आहेत.
धाराशिव जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या चावडी बैठका, कार्यकर्त्यांची बांधणी व संघटनात्मक घडामोडींचा आढावा घेण्यासाठी तसेच आगामी दि. 29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या उपोषण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यासाठी दादा धाराशिव दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात ते जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून त्यांना आंदोलनाच्या पुढील टप्प्यांची दिशा व कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे, मनोज दादा संपूर्ण दिवस धाराशिव शहरातच उपस्थित राहणार असून इच्छुक कार्यकर्ते व नागरिक यांना त्यांच्या भेटीसाठी संधी मिळणार आहे.
या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील मराठा समाज कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या उपस्थितीची तयारी जोरात सुरू आहे.
---
0 टिप्पण्या