प्रतिनिधी...मनोज जाधव
धाराशिव तालुकास्तरीय SPELLING BEE स्पर्धेत रुईभरच्या विद्यार्थ्यांचा विजय
🗓️ दिनांक : 11 ऑगस्ट 2025
📍 स्थळ : धाराशिव
धाराशिव तालुकास्तरीय SPELLING BEE स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, रुईभर येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
इयत्ता पहिलीतील भूमी भालचंद्र भोईटे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर मनीष महेश कुलकर्णी याने उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक मिळवून शाळेचा मान उंचावला.
स्पर्धेनंतर माननीय CEO श्री मैनाकजी घोष साहेब यांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या यशामागील मार्गदर्शक वर्गशिक्षक श्री भोसले बी. के. व मुख्याध्यापक श्री पवार पी. एस. यांचे कौतुक CEO साहेब तसेच धाराशिवचे BEO श्री आसरारजी सय्यद साहेब यांनी केले.
💐 या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भूमी आणि मनीष यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. 💐



0 टिप्पण्या