Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

विजेचा शॉक देणाऱ्या महावितरण कडून जपली गेली माणुसकी पूरग्रस्त शेतकऱ्यांना एक हात माणुसकीचा एक हात मदतीचा या संकल्पनेतून लाखो रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या हातात....


 विजेचा शॉक देणाऱ्या महावितरण कडून जपली गेली माणुसकी पूरग्रस्त शेतकऱ्यांना एक हात माणुसकीचा एक हात मदतीचा या संकल्पनेतून लाखो रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या हातात....


प्रतिनिधी....मनोज जाधव 


   धाराशिवमध्ये महावितरण कर्मचाऱ्यांचा माणुसकीचा हात – पगारातून दीड ते दोन लाखांचा निधी गोळा करून पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत



जिल्ह्यातील सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिके, जनावरे आणि शेतीसाठी लागणारी साधनसामग्री यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.



अशा गंभीर परिस्थितीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) धाराशिवच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत माणुसकीचा खरा परिचय दिला आहे. “फुल नाही, फुलाची पाकळी तरी” या भावनेतून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातून रक्कम जमा करून जवळपास दीड ते दोन लाख रुपयांचा निधी गोळा केला.



हा निधी थेट पुरग्रस्त व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला असून, त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराला पुन्हा उभारी देण्यासाठी ही मदत उपयोगी ठरत आहे...



महावितरण कर्मचाऱ्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. “या कार्याचा आदर्श घेऊन इतरांनीही शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा” अशी भावना जनमानसातून व्यक्त केली जात आहे.



शेतकरी वर्गाने देखील या मदतीबद्दल समाधान व्यक्त करत, “सरकारी कर्मचारी जर अशा संकटात पुढे येऊ शकतात, तर समाजातील प्रत्येक घटकाने मदत करण्याची गरज आहे” असे मत व्यक्त केले.




---

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या