Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

घरात शोक, पण जनतेला आधार"-वैयक्तिक दुःख विसरून जनतेच्या सुरक्षेसाठी पुढे धावले सीईओ मैनाक घोष


 

प्रतिनिधी...मनोज जाधव 

धाराशिव:कर्तव्यनिष्ठेचे खरे उदाहरण दाखवणारा एक प्रेरणादायी प्रसंग धाराशिव जिल्ह्यात घडला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी वडिलांच्या निधनासारख्या असीम दुःखाच्या क्षणीही वैयक्तिक भावना बाजूला ठेवून लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले.



कालच मैनाक घोष यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले. घरात शोककळा पसरली होती,तरीही दुसऱ्याच दिवशी वडगाव सिद्धेश्वर येथील पाझर तलाव क्रमांक ०२ जोरदार पावसामुळे धोकादायक स्थितीत गेल्याची माहिती मिळताच त्यांनी एक क्षणही न घालवता घटनास्थळी धाव घेतली.तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.



या वेळी गावातील सदस्य यांनी तातडीने संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली.दुःखाच्या सावटाखाली असूनही,मैनाक घोष यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून अधिकाऱ्यांना योग्य निर्देश दिले.जलसंधारण विभाग,गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना तलावाच्या सांडव्याची खोली वाढवून पाण्याचा सुरक्षित विसर्ग करण्याचे आदेश त्यांनी दिले.त्यांच्या या वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला आणि गावकऱ्यांनी निश्वास टाकला.


मैनाक घोष यांची ही कर्तव्यनिष्ठा केवळ प्रशासनासाठीच नव्हे तर प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरावी अशी आहे.वैयक्तिक शोकापेक्षा जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देणारे अधिकारी दुर्मिळच.त्यांच्या या कृतीने ‘अधिकारी असावा तर असा!’ हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.


सत्यमेव जयते एक्सप्रेस न्यूजतर्फे दिवंगत वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून,सीईओ मैनाक घोष यांच्या या समर्पणाला व लोककल्याणाच्या भावनेला सन्मानपूर्वक सलाम!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या