Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement


 प्रतिनिधी...मनोज जाधव 


पूरग्रस्त धाराशिव जिल्ह्यात संताप: जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या डान्स व्हिडिओवरून कडक कारवाईची करा-आर पी आय (सचिन खरात) महसूलमंत्र्याकडे मागणी



मराठवाड्यासह धाराशिव जिल्हा महापूरामुळे उद्ध्वस्त झाला असून शेतकरी कुटुंबे उपाशीपोटी व घरदाराविना उघड्यावर आली आहेत. शेतकऱ्यांची पिकं नष्ट झाली असून आत्महत्येच्या उंबरठ्यावर अनेक बळीराजे उभे आहेत. अशा गंभीर परिस्थितीत धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार व निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या नाच करतानाचा व्हिडिओ 26 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार-खासदार यांनी "मदत करू" अशी आश्वासनं दिली असली तरी आजवर पूरग्रस्तांना ठोस मदत मिळालेली नाही. अशा स्थितीत जबाबदार अधिकारी पूरग्रस्तांच्या वेदनांवर पाणी फेरत नृत्याचा आनंद घेत असल्याने जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत


राऊत यांनी केलेल्या प्रमुख मागण्या:

1.धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार व निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशी करावी.

2.धाराशिवसह मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत, मोफत धान्य व पिकविमा द्यावा.

3.मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार-खासदार यांनी दिलेली आश्वासनं तात्काळ अंमलात आणावीत.

4.असंवेदनशील व जबाबदारी टाळणाऱ्या अधिकाऱ्यांना कायमचे सेवेतून बडतर्फ करण्याची तरतूद करावी.

या मागण्यांची दखल न घेतल्यास धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राजाभाऊ राऊत यांनी निवेदनात दिला आहे.

पूरग्रस्त जनता आक्रोशत असताना अधिकारी डान्स करताना दिसत असल्याने, "हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे," असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या