📰 पावसाने केली घरांची उध्वस्त कहाणी, पत्रकार प्रताप मोरे यांचेही घर जमीन दोस्त...
प्रतिनिधी...मनोज जाधव
धाराशिवमध्ये पावसाचा कहर सुरूच; सलगरा दिवटीत अनेक घरांची पडझड, आमदार राणा पाटील यांचा पाहणी दौरा
धाराशिव जिल्ह्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी या गावात सततच्या पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे.
या पार्श्वभूमीवर तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आज प्रत्यक्ष दौरा करत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पुण्यनगरीचे पत्रकार प्रताप मोरे यांचे घर पावसामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून त्याचीही त्यांनी पाहणी केली.
आमदार पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत सांगितले की,
"प्रत्येक बाधित कुटुंबाला शासन स्तरावरून मदत दिली जाईल. पण त्याचबरोबर आपण काळजी घ्यावी आणि सुरक्षित स्थळी राहावे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे."
सलगरा दिवटीसोबतच परिसरातील इतर गावांतील नुकसानाचीही आमदारांनी पाहणी केली असून तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे आश्वासन दिले.
👉 पावसामुळे झालेल्या या भीषण परिस्थितीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शासन व स्थानिक प्रशासनाकडून तातडीची मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
---



0 टिप्पण्या