Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

धाराशिव नगरपरिषद निवडणूक : प्रभाग 19-A मध्ये निलेश साळुंखे यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद





धाराशिव नगरपरिषद निवडणूक : प्रभाग 19-A मध्ये निलेश साळुंखे यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 


     प्रतिनिधी....मनोज जाधव 


धाराशिव : नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19-A मध्ये उमेदवार निलेश भैय्या राम साळुंखे यांच्या प्रचाराला मोठी गती मिळताना दिसत आहे. प्रचार रॅलींमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असून डोअर टू डोअर भेटीगाठींनाही वेग आला आहे. परिसरातील नागरिक त्यांच्या स्वागतासाठी पुढाकार घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.



स्थानिक नागरिकांच्या मते, साळुंखे हे हिंदू-मुस्लिम आणि सर्व समाजात मिसळून काम करणारे सर्वसमावेशक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. मराठा समाजासह विविध घटकांसाठी कार्यरत राहिल्यामुळे त्यांना प्रभागात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्थानिकांचे मत आहे.



प्रभागातील तरुणाई, महिलावर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांकडूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र प्रचारात दिसून येत आहे. रॅली, पदयात्रा आणि वैयक्तिक भेटीतून साळुंखे यांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत स्थानिक प्रश्नांची माहिती घेतली.


नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 19-A मध्ये वातावरण रंगत असून साळुंखे यांच्या प्रचारातील वाढती लोकसंख्या स्थानिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या