आंबेजवळग्यात राजकीय भूकंपाची चाहूल…!
“यावेळी जिल्हा परिषद मेंबर स्थानिकच!” — जनतेचा एकसुरात सूर
आंबेजवळगा | प्रतिनिधी ...मनोज जाधव
आंबेजवळगा जिल्हा परिषद गटात यावेळी स्थानिक, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी झगडणारे नेतृत्वच हवे असा ठाम सूर जनतेतून उमटू लागला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या सुख-दुःखातील सहकारी, तरुणांचा विश्वास आणि जनतेचा आवाज ठरलेले नेतृत्व अक्षय नाईकवाडी यांच्या मातोश्रींनी आंबेजवळगा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी तरुण वर्गातून पुढे येत आहे.
अक्षय नाईकवाडी हे केवळ नाव नव्हे, तर संघर्ष, तळमळ आणि जनसेवेचा ठसा आहे. दूरदृष्टी असलेले, समाजाभिमुख आणि अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहणारे नेतृत्व म्हणून त्यांनी अल्पावधीतच जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेले भरीव कार्य आज चर्चेचा विषय ठरत आहे.
🌾 शेतकऱ्यांचे प्रश्न असोत…
♿ दिव्यांग, निराधारांचे दुःख असो…
🎓 विद्यार्थ्यांचे प्रश्न असोत…
👩 महिलांचे सक्षमीकरण असो…
💪 युवा सशक्तीकरण असो…
प्रत्येक ठिकाणी अक्षय नाईकवाडी हे नाव आंदोलनाच्या अग्रभागी दिसून आले आहे. मराठा, धनगर, मुस्लिम, बंजारा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला असून, शेतकरी आंदोलनातही त्यांची भूमिका कायमच आक्रमक व स्पष्ट राहिली आहे.
त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आज आंबेजवळगा गटातील तरुण वर्ग प्रचंड भारावून गेला असून, “यावेळी बदल हवाच” अशी ठाम भावना तयार होत आहे.
त्यांची उमेदवारी ही विकासाच्या वाटचालीला निश्चितच गती देणारी ठरेल, असा विश्वास जनतेतून व्यक्त केला जात आहे.
👉 महत्त्वाचा राजकीय प्रश्न मात्र कायम…
🔹 अक्षय नाईकवाडी आपल्या मातोश्रींना जिल्हा परिषदेसाठी मैदानात उतरवणार का?
🔹 की स्वतः पंचायत समितीची रणधुमाळी गाजवणार?
हे चित्र येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होणार असले तरी, आंबेजवळग्यातील राजकीय वातावरण मात्र आधीच तापले आहे…!
एक मात्र नक्की —
🔥 “अक्षय नाईकवाडी” हे नाव येणाऱ्या निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी असणार!


0 टिप्पण्या