Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

बेंबळी जिल्हा परिषद गटातून शिंदे सेनेकडे उमेदवारीची मागणी ; आकाश गोरोबा चव्हाण निवडणूक रिंगणात सज्ज!


 बेंबळी जिल्हा परिषद गटातून शिंदे सेनेकडे उमेदवारीची मागणी ; आकाश गोरोबा चव्हाण निवडणूक रिंगणात सज्ज!


बेंबळी | प्रतिनिधी.       मनोज जाधव 

धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी जिल्हा परिषद गटात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, शिंदे गटाच्या शिवसेनेकडून आकाश गोरोबा चव्हाण राहणार रुईभर यांनी निवडणूकी साठी उमेदवारीची मागणी करत जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांच्या या तयारीमुळे बेंबळी गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

आकाश चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आले आहेत. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक व महिलांच्या प्रश्नांसाठी त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. "सत्तेपेक्षा सेवा महत्त्वाची" हा विचार घेऊन त्यांनी काम केल्यामुळे त्यांना गटात मोठा जनाधार लाभलेला आहे.

शिंदे गटाच्या शिवसेनेने ग्रामीण भागात संघटन मजबूत करण्याचा निर्धार केला असून, त्याच पार्श्वभूमीवर आकाश चव्हाण यांच्यासारख्या तरुण, आक्रमक आणि लोकांशी थेट संपर्क असलेल्या नेतृत्वावर पक्षाने विश्वास दाखवला आहे. बेंबळी गटात शिवसेना शिंदे गटाला मजबूत करण्यासाठी ही उमेदवारी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

आकाश चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू होताच गटातील इतर राजकीय पक्षांमध्ये हालचाली वाढल्या असून, संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे युवकांमध्ये आकाश चव्हाण यांच्याबद्दल मोठा उत्साह पाहायला मिळत असून, सोशल मीडियावरही त्यांच्या समर्थनार्थ पोस्ट आणि प्रतिक्रिया वाढत आहेत.

बेंबळी जिल्हा परिषद गटातील विकासाची रखडलेली कामे, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार आकाश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. "गटाचा सर्वांगीण विकास हाच माझा अजेंडा असून जनतेचा विश्वास हाच माझा विजय आहे," असे त्यांनी सांगितले.

एकूणच बेंबळी जिल्हा परिषद गटातून शिंदे सेनेकडून आकाश गोरोबा चव्हाण सज्ज झाल्याने, येणाऱ्या निवडणुकीत ही लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता असून पक्ष त्यांना उमेदवारी देणार का, राजकीय घडामोडीकडे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या