Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

मानवी हक्क अभियानाच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी तानाजी खांडेकर यांची नियुक्ती सामाजिक कार्याची दखल घेत राज्याध्यक्ष डॉ. मच्छिंद्र गवाले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान



 मानवी हक्क अभियानाच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी तानाजी खांडेकर यांची नियुक्ती


सामाजिक कार्याची दखल घेत राज्याध्यक्ष डॉ. मच्छिंद्र गवाले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान


तुळजापूर | प्रतिनिधी....राम थोरात


तुळजापूर तालुक्यातील सामाजिक कार्यात सक्रिय असलेले तानाजी खांडेकर यांची मानवी हक्क अभियानाच्या तुळजापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्याची दखल घेत मानवी हक्क आयोगाचे राज्याध्यक्ष डॉ. मच्छिंद्र गवाले यांनी ही निवड जाहीर करत नियुक्तीपत्र प्रदान केले.

यावेळी डॉ. मच्छिंद्र गवाले यांनी तानाजी खांडेकर यांना शुभेच्छा देत, येणाऱ्या काळात तुळजापूर तालुक्यात मानवी हक्क अभियानाच्या सर्व शाखा गठित करून संघटना अधिक मजबूत करावी, तसेच अभियानाने निश्चित केलेल्या घटनेनुसार कार्य करून तळागाळातील, वंचित व पीडित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तानाजी खांडेकर यांनी यापूर्वी विविध सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या प्रश्नांवर सक्रिय भूमिका बजावली असून, त्यांच्या या अनुभवाचा लाभ मानवी हक्क अभियानाला निश्चितच होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

नियुक्तीनंतर तानाजी खांडेकर यांनी राज्याध्यक्ष व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानत, मानवी हक्क संरक्षण, अन्यायाविरोधात लढा आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या नियुक्तीमुळे तुळजापूर तालुक्यात मानवी हक्क अभियानाच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

#humanright

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या